पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मार्गदर्शक, सहकारी शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी यांच्या माध्यमातून साकारलेल्या शैक्षणिक कर्तव्यामुळे शाळेचा गुणवत्तापूर्ण नावलौकीक होत आहे. याच गुणवत्तापूर्णतेसाठी नावीन्यपुर्ण उपक्रमशीलतेतून कार्यरत राहील्याने आदर्श शिक्षक पुरस्काराला गवसणी घालता आली. त्यामुळे हा पुरस्कार शाळेच्या गुणवत्तापुर्णतेचा सन्मानच असल्याचे प्रितदान आदर्श शिक्षक पुरस्कार प्रप्त उपक्रमशील शिक्षक प्रमोद लोणारकर यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रमोद प्रकाश लोणारकर यांना पंढरपूर तालुका पुरोगामी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या निमीत्ताने रोपळे ग्रमस्थ व शाळा व्यवस्थापन स मिती यांच्यावतीने लोणारकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना लोणारकर बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, या पुरस्कारामध्ये शैक्षणिक कार्यातील प्रत्येक घटकाचा मोलाचा वाटा असून पुरस्कारामुळे भविष्यामध्ये अधिक चांगले काम करण्याची उर्जा मिळणार आहे. असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ , अशोक शेडगे, तात्यासो गांजाळे , बबन क्षिरसागर, रवी बिस्कीटे, सागर बिस्कीटे, जोतिराम लोखंडे, सज्जन भोसले, रमेश भोसले, शाळेतील शिक्षक यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांकडून होणार्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक अरूण माळी यांनी केले तर अभार समाधान आयरे यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.