पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल, सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यू जी प्रोग्राम ना नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडीटेशन (एनबीए) समितीकडून मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडीटेशन (एनबीए) समितीकडून २७, २८ व २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत समितीकडून भेट देण्यात आली होती. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील महाविद्यालयाचा दृष्टीक्षेप, शिक्षणप्रणाली, विद्यार्थ्यांच्या परिक्षणाची पद्धती निकालाची परंपरा, प्रत्येक वर्षी केले जाणारे परिस्थिती जन्य बदल, प्राध्यापक, लॅब, सर्व सुविधा, विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील योगदान, त्यांना महाविद्यालयांकडून मिळणारे सहकार्य या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येक विभागातील कागदपत्रांची तपासणी केली होती. यामध्ये टीचिंग-लर्निंग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, स्टुडंट सक्सेस रेट, करिअर गाइडन्स, प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांचा-पालकांचा फिडबॅक, आऊट कम बेस्ड एज्युकेशन यांचे मूल्यमापन केले. त्याचबरोबर वर्कशॉप, ग्रंथालय, प्रथम वर्षांच्या सर्व प्रयोगशाळा, ऑफिस, जिमखाना, कँटिन, मुलांनी केलेले प्रोजेक्ट, सर्व विभागातील लँब आणि विभागातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणी नंतर पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील तीन प्रोग्राम ना एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. एनबीए मानांकन प्राप्त झाल्यानंतर सिंहगड काॅलेज मधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्गामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले.
मुल्यांकन यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा नामदेव सावंत,डाॅ. भालचंद्र गोडबोले, प्रा अनिल निकम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. समीर कटेकर, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डाॅ. यशवंत पवार आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.