सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.सिध्दीविनायक देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री गणेश याग (यज्ञ)पूजा समारोप ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री. 1008 जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी पीठ यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रम संपन्न झाला*. दिनांक 17 सप्टेंबर वार मंगळवार रोजी ( सकाळी अकरा वाजता गणेश याग पूर्णाहुती
कार्यक्रम, काशी जगद्गुरूंच्या अमृत हस्ते श्री गणेश महापूजा, महाआरती संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मल्लिकार्जुन होसमठ परिवाराकडून जगद्गुरुंची पूजा संपन्न झाली. तदनंतर गणेशयाग विधिवत पूजा करणारे वेदमूर्ती ईश्वर शास्त्री होळीमठ,प्रशांत स्वामी ,केदार स्वामी व गणेश याग केलेल्या सर्व दांपत्यांना काशी जगद्गुरूंच्या अमृतहस्ते सिद्धिविनायक प्रतिमा देऊन आशीर्वाद देण्यात आले.
प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी कार्यक्रमाचे स्वरूप प्रास्ताविकातून विशद केले. याप्रसंगी ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री.1008 जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी आपल्या आशीर्वाचनातून म्हणाले की, "पार्वती पुत्र विनायक देवगणांचा अधिपती म्हणून गणपती असून, भारतीय संस्कृतीत कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणपती पूजनानेच करण्यात येते. आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये होम याग यज्ञ केला त्याबद्दल समाधान व्यक्त केले.आपल्या संस्कृतीत होमहवनाला सर्वाधिक महत्त्व आहे ,यामुळे वातावरणातील अशुद्धतेचे शुद्धीकरण होते,मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होतो.याच बरोबर उपस्थित भक्तगणांना गोमाता पूजनाचे महत्त्वही सांगितले.भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराघरात महिलां व मुलींचा मानसन्मान व्हावा,त्यांचे रक्षण व संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असेही आपल्या आशीर्वाचनातून सांगितले. याप्रसंगी उपस्थित भक्तगणांच्या वतीने प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी जगद्गुरुंविषयी ऋण व्यक्त केले.कार्यक्रमास्थळी श्री. मल्लिकार्जुन (सिद्धू मुत्त्या) होसमठ परिवाराकडून सर्वच भक्त गणांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सन्मित्र नगर परिसरातील व सिद्धिविनायक परिवारातील सर्व माता -पिता, वडीलधारी मंडळी, युवक मंडळी, गणेश बालभक्त इत्यादींचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन व आभार प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले. श्री.गणेश आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.