सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल व एस एस कलशेट्टी प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने सुमंगलाय लायन्स गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत,लायन्स क्लब अध्यक्ष चक्रधर अन्नलदास यांच्या अध्यक्षतेखाली माजी गव्हर्नर ला.अरविंद कोणशिरसगी,झोन प्रमुख ला विठ्ठल सारंगी,ला प्रा स्वामीनाथ कलशेट्टी,ॲड.ला. श्रीनिवास कटकुर , ला.केदार स्वन्ने, ला.चंद्रकांत यादव, ला.धुळम, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन अप्रतिम पूजनाने करण्यात आले. एडवोकेट श्रीनिवास कटकुर यांच्या प्रस्तावनेनंतर लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल एस एस कल शेट्टी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ मध्ये शिक्षण क्षेत्रात नवोपक्रमशील ,भरीव कार्य करणाऱ्या आदर्श गुणवंत शिक्षकांचा आज रोजी पुर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्ना चौक सोलापूर येथे गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करून शिक्षकांचा गौरव करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब यांचा शिस्तप्रिय,कर्तव्यदक्ष,उपक्रमशील गुणवंत शिक्षणाधिकारी म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांमध्ये- एस के म्हमाणे , राम ढाले , सत्यवान बनसोडे ,प्रा श्रीधर सगेल ,प्रा संजय जाधव,रूपाली खराडे,संतोषी रेळेकर ,लक्ष्मी कनकी व संजीवनी सादुल आदींचा सन्मान चिन्ह,सन्मानपत्र, शाल,बुके, व साने गुरुजी पुस्तक देऊन समयोचित सत्कार करण्यात आला. पुरस्कार मूर्तींच्या व लायन्स अधिकाऱ्यांच्या मनोगतानंतर प्रमुखअतिथी श्री सचिन जगताप साहेब शिक्षकां समोर बोलताना, लायन्स क्लब व कलशेट्टी परिवाराकडून करण्यात आलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा यथोचित गौरवोद्गार काढून उपस्थित शिक्षकवृंदाना मार्गदर्शन केले.अरविंद कोणशिरसगी यांनी लायन्स क्लब राबवित असलेले विविध उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार चंद्रकांत यादव यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन आयोजक प्रा ला.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी सदस्य व सौ सुनीता कलशेट्टी मॅडम,ऐश्वर्या कलशेट्टी,प्रा.बिराजदार दत्तात्रय , सुनील अतनुरे व काशिनाथ कोळी आदींचे बहुमोल सहकार्य लाभले .