मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
बद्रुद्दीन तयबजी उर्दू हाय स्कुल या नावाने बोगस शाळा हि अनुदानित शाळा म्हणून चालविणाऱ्या नामांकित अंजुमन आय इस्लाम संस्थेचे पाय अजुन खोलात गेले आहेत, महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगा पाठोपाठ शिक्षण आयुक्त कार्यालयाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या संस्थेला २०१९ मध्ये चौकशीत पाठिशी घालणाऱ्या तत्कालीन शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे व उपनिरीक्षक रंजना राव यांची चौकशी तसेच संस्थेने बोगस शाळा चालवल्या बद्यल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई विभागीय शिक्षक उपसंचालक यांना दिले.
अंजुमन आय इस्लाम हि संस्था बद्रुद्दीन तयबजी उर्दू हायस्कूल हि बोगस शाळा चालविते तसेच या शाळेचा उल्लेख अनुदानित शाळा म्हणून संस्थेच्या वेबसाइटवर करते, शाळेच्या दैनंदिनीत करते तसेच या शाळेचे नाव संस्थेच्या प्रदर्शनी भागात करते व पालक व शासनाची फसवणूक करते अशी पुराव्या सहित तक्रार पालक जाहीद हुसैन ईद्रीसी यांनी शिक्षण विभागास केली होती पण तात्कालीन उत्तर मुंबई शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे व उपनिरीक्षक रंजना राव यांनी शाळा मुखयाद्यापिका यांच्या कडून माफी पत्र घेऊन दडपले होते व वारंवार पाठपुरावा करून देखील शिक्षण विभागाने ईद्रीसी यांना दाद दिली नाही.
एवढे गंभीर प्रकरण दडपले गेल्याने ईद्रीसी यांनी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक संघटनेचे नितीन दळवी यांच्या शी संपर्क साधला, दळवी यांनी शिक्षण विभागास व महाराष्ट्र राज्य बालहक्क स आयोगास केली, आयोगाने याची गंभीर दखल घेत या शाळा मुखयाद्यापकांना ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले तसेच दक्षिण मुंबई शिक्षण निरीक्षक यांना देखील चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, शालेय शिक्षण विभागाने संस्थेला पाठिशी घालणाऱ्या निरीक्षक राजेंद्र आहिरे व उपनिरीक्षक रंजना राव यांच्या चौकशीचे आदेश शिक्षण आयुक्तांना दिले आहे.
नोंद करण्यासारखी विषेश बाब म्हणजे संस्थेला ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश बालहक्क आयोगाने दिले होते, पण आजतागायत संस्थेने आयोगाला अहवाल पाठवला नसल्याची बाब आयोगाने महिती अधिकारात नितीन दळवी यांना दिली.
शिक्षण विभागाने चौकशीचा बडगा उगारल्यावर संस्थेचे धाबे दणाणले व त्यांनी बद्रुद्दीन तयबजी उर्दू हायस्कूल हि सरकारमान्य अनुदानित शाळा असल्याचे नाव वेबसाइटवर वरुन ताबडतोब काढून टाकले तसेच शाळा ईमारतीच्या प्रदर्शनी भागावरून हटवले, या वरुन संस्थेने स्वताच सिद्ध केले कि बद्रुद्दीन तयबजी उर्दू हायस्कूल हि बोगस अनुदानित शाळा ते चालवत होते, पण महासंघाचे नितीन दळवी यांची मागणी आहे की या बोगस शाळेने सन २०१५ ते २०२४ पर्यंत किती विद्यार्थ्यांना बोगस निकाल दिले? , कीती विद्यार्थ्यांना बोगस शाळा सोडल्याचे दाखले देऊन फसवणूक केली? बोगस शाळेला शिक्षण विभागाचा युडायस नं नसताना हि शाळा हि अनुदानित शाळा असल्याचे वेबसाइटवर का टाकले, या बाबत संस्था चालकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तसेच पुरावे मिळुन सूद्धा संस्थेला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करुन चौकशी पूर्ण व्हायला हवी अन्यथा शालेय शिक्षण विभागा विरोधात बोगस शाळेला पाठिशी घालुन चौकशी पूर्ण न केल्याबद्दल महासंघ मा. न्यायालयात खेचणार आहे.