पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर नगरपरिषद येथे नगर रचना सहायक इंजिनीयर सुहास झिंगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी लायसन्स इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनिअर सारंग कोळी यांनी तीव्र शब्दात निषेध केला. नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर यांच्यासमवेत नगरपालिकेचे इंजिनिअर सोमेश धट व सुहास झिंगे यांच्या समवेत याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यात आली.
एखादे काम सामोपचाराने होत असताना मारहाण करणे हे गैर आहे म्हणुन म्हणून आम्ही लायसन्स इंजिनीयर असोसिएशन तर्फे जाहीर निषेध करीत असून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत अशी काही अध्यक्ष सारंग कोळी यांनी दिली.
या प्रसंगी बोलताना उपमुख्य अधिकारी वाळूजकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना जनतेची कामे वेळेत व तत्परतेने करून द्यायच्या सूचना दिल्या. सचिव सोमनाथ काळे ,बाळ कुंभार, पांडुरंग आलोनी , इमरान बेद्रेकर यांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या व पेंडींग फाईल संदर्भात चर्चा केली.
याप्रसंगी सचिन माळवदे ,सचिन पाटील, हनुमंत खिलारे, संतोष रोपळकर ,ललित पाटील ,अमित लाडे ,सचिन धुमाळ ,गोपाळ धोत्रे डी. जे. गव्हाणे, जमीर शेख आदी सर्व इंजिनियर्स उपस्थित होते.