पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात सोमवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी रुसा कंपोनंट आठ अंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने ‘भक्ती चळवळ: ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि तात्विक दृष्टिकोनातून अभ्यास’ या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली आहे.
प्रसिद्ध पत्रकात माहिती देताना ते पुढे म्हणाले की, “ या एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (ऑडीट) तथा छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे असतील. हे चर्चासत्र एकूण तीन सत्रामध्ये संपन्न होणार असून ‘संत साहित्यामधील संत तुकारामांचे योगदान’या विषयावरील सत्रात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. विकास कदम हे असतील
‘स्त्री मुक्तीच्या दिशेने भक्ती पंथ’ या विषयावरील सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड ह्या तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. विष्णू वाघमारे हे अध्यक्ष आहेत.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. सतीश कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे आहेत. या चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या प्राध्यापक, शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी यांना भक्ती चळवळीच्या संबंधित विषयावर संशोधन पेपर सादर करता येतील. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी या चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी, प्रा. श्रीमती सुमन केंद्रे, प्रा. कल्याण वाटाणे, डॉ. उमेश साळुंखे, प्रा. बाळासाहेब गायकवाड, डॉ. भारती सुडके, प्रा. विनोद आखाडे प्रा. मयूर चव्हाण आदी शिक्षक तर अभिजित जाधव, ओंकार नेहतराव, अमोल माने, सुरेश मोहिते आदी शिक्षकेतर सेवक परिश्रम घेत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील इतिहास विषयाच्या आणि भक्ती चळवळीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन इतिहास विभाग प्रमुख डॉ. रविराज कांबळे यांनी केले आहे.