शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती मोठी..डॉ.नसिम पठाण यांचे प्रतिपादन
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्मिता गायकवाड यांनी भगवा सप्ताह कार्यक्रमाच्या अंतर्गत अस्मिता ताई ची वारी गुणवंतांच्या दारी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील अनेक गुणी मान्यवरांच्या प्रत्यक्ष गृह भेटी घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव या उपक्रमातून केला जात आहे. त्याचबरोबर या मान्यवरांची प्रेरणा व त्यांचे आशीर्वाद घेणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे असे अस्मिता ताई गायकवाड यांनी सांगितले, सोमवारी सायंकाळी सात वाजता अस्मिता ताई ची वारी थेट ज्येष्ठ समाजसेविका साहित्यिक, प्रा. डॉ. नसिम पठाण यांच्या निवासस्थानी पोहचली. यावेळी अस्मिता ताईंच्या शुभहस्ते त्यांचा शाल , पुष्ष गुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .
या भेटीमध्ये अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयसह साहित्या वर चर्चा देखील झाली. यावेळी नसिम पठाण यांनी साहित्य हे समाजाला समृद्ध करणारे महत्त्वाचे माध्यम आहे, तुम्ही आमच्या सारख्या साहित्यिकांना अशा छोट्या कार्यक्रमातुन हत्तीचे बळ देत आहात असे सांगून हा उपक्रम निश्चितच अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले
याप्रसंगी अस्मिता गायकवाड यांनी देखील डॉ.नसिम पठाण यांच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास दिशादर्शक आहे असे सांगून अस्मिता ताईंचा सत्कार करून त्यांच्या कार्याला शुभकामना दिल्या.
यावेळी ॲड.सुरेश गायकवाड, प्रियंका वाघमोडे,प्रा.सुमीत गाडेकर, सुरेश काळंगे , प्रा.प्रसंन्न गव्हाणे आदी उपस्थित होते.