मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले अनेक वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता या शहरातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पत्रकार सुरक्षा समिती वतीने केला जात आहे त्याच बरोबर समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो
पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पंढरपूर येथील जेष्ठ पत्रकार दत्ताजी पाटील यांना देण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मान पत्र व शाल घालून दत्ताजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख बीडकर जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद उपस्थित होते
*राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार माझ्यासाठी अनमोल*
पंढरपूर येथे गेल्या अनेक वर्षापासून अन्याग्रस्त अत्याचारग्रस्त व वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी उभं आयुष्य पणाला लावून रंजल्या गांजल्या लोकांच्या उद्धारासाठी विकासासाठी समृद्धीसाठी मी आपली पत्रकारिता पणाला लावली असून माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित पिढी घटकासाठी प्रसाद संदर्भात नेहमीच प्रयत्न करीन पत्रकार सुरक्षा समिती वतीने मला मिळालेला आदर्श पत्रकार पुरस्कार हा माझ्यासाठी अनमोल असल्याचे मत पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून दत्ताजी पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.