पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मार्कंडेय जलतरंग तलाव, सोलापूर येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलचा विजय झाला.
खेळातील मुलांची नावे : १७ वर्षाखालील मुले -
ओम अविनाश पाटील प्रथम क्रमांक, सुजल सुखदेव कदम द्वितीय क्रमांक.
१७ वर्षाखालील मुली -
संस्कृती प्रमोद कटारिया प्रथम क्रमांक. आलिया मोलासी द्वितीय क्रमांक.
वरील सर्व विद्यार्थ्यांची पुणे येथील विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड.
विजयी शाळेचे क्रीडा शिक्षक भूषण तायडे, पल्लवी पाटील आणि कविता कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे प्राचार्य शिवाजी गवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.