सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा एमडी२४न्यूजचे संपादक सैफन शेख यांनी आपल्या हक्काच्या न्याय मागण्यांना वाचा फोडण्यासाठी गुरूवारी १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पुनम गेट) समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या आंदोलनाला अनेक संस्था,संघटना व पत्रकारांनी पाठिंबा दर्शविला आहे.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुहास दत्तात्रय माने यांच्या कारभाराची चौकशी करावी,सोलापूर पालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी अर्हता नसताना प्रतिनियुक्ती केलेल्या डॉ.राखी सुहास माने यांना निलंबित करून मुळ ठिकाणी पाठवावे,उप सचिव अनिरूध्द जेवळीकर यांनी अर्हता नसताना डॉ. राखी माने यांची सोमपाच्या आरोग्य अधिकारीपदी प्रतिनियुक्ती केली असल्याने शासन निर्णय व पालिकेच्या सेवा भरती नियमास हरताळ फासल्याप्रकरणी उप सचिव अनिरूध्द जेवळीकर यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करावे. आपल्यावरील डॉ.राखी माने यांचा कथित भाऊ श्रीकांत गायकवाड व राजेश भोई मेडिकल बिल दलाल कडून हल्ला झाला. तरी त्या हल्लेखोरावर तात्काळ गुन्हा दाखल करावा.
सोलापूर शहरात फिरून 'भीक मांगो' आंदोलन करणार - या नंतरही डॉ.राखी सुहास माने यांची प्रतिनियुक्ती रद्द न केल्यास सोलापुरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सोलापूर शहरात फिरून 'भीक मांगो' आंदोलन करण्यात येणार आहे. या 'भीक मांगो' आंदोलनातून जमा झालेली रक्कम ही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत,उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर,प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांना देण्यात येणार आहे.
पालिकेच्या जागेत लोकप्रतिनिधींनी केलेले अनधिकृत अतिक्रमण - माजी नगरसेवीका फिरदोस पटेल व सन्माननीय गल्ली गुंड शौकत मुस्तफा पठाण यांनी केलेल्या भ्रष्टाचार व अनधिकृत अतिक्रमण बाबत माहिती अधिकार व प्रसार माध्यमातून प्रसारित केल्याबाबत चिडून जावून माझ्या विरोधात खोटे नाटे गुन्हे दाखल करून मला पोलीस दप्तरी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदी मागण्या शेख यांनी एका निवेदनाद्वारे केल्या आहेत. आपल्यावरील खोटे गुन्हे रद्द करून सदर मागण्यांची शासन प्रशासन यंत्रणा मार्फत सखोल चौकशी करून तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती वजा मागणी शेख यांनी केली आहे.