पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एम आय टी ज्यू कॉलेज वाखरी पंढरपूर येथे इयत्ता अकरावीच्या मुलांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. यावेळी बोलताना कॉलेज चे प्राचार्य डॉ स्वप्नील शेठ यांनी सततची मेहनत हिच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरकिल्ली आहे हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेज व्यवस्थापन व शिक्षक यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्व ती मदत केली जाईल याची ग्वाही प्राचार्य डॉ स्वप्नील शेठ यांनी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी कॉलेजच्या हेड मिस्ट्रेस सौ शिबाणी बॅनर्जी , स्कूल चे प्राचार्य शिवाजी गवळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते