सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्रावण मासानिमित्त एमआयडीसी चन्नवीर नगरातील श्री पंचमुखी परमेश्वर मंदिरामध्ये संगीत रुद्राभिषेक, पंचमुखी शिवलिंगास तांदूळ पूजा, सहित राज वैभवात श्रीमद काशी जगद्गुरु श्री.श्री.श्री. 1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त, दाम्पत्यासहित विशेष महापूजा संपन्न.
काशीपीठचे नूतन जगद्गुरु श्री. श्री. श्री. 1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य नेतृत्वाखाली श्री.बृहन्मठ होटगी मठाच्या वैदिक वृंदांच्या संगीतमय रुद्राभिषेक व पंचमुखी शिवलिंगास तांदूळ पूजा बांधण्यात आली.
याप्रसंगी जगद्गुरूंच्या अध्यक्षतेखाली श्री काशीचे जेष्ठ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी वेदमूर्ती सिद्धया हिरेमठ ,सचिव शांतया स्वामी, पदाधिकारी ,संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद, वैदिकवृंद ,दांपत्य व असंख्य भक्तगण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सचिव .शांतया स्वामी सर यांनी केले .यावेळी सदभक्त श्री बलसुरे, प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी ,वेदमूर्ती सिद्धया हिरेमठ, आदींनी आपल्या मनोगतातून जेष्ठ जगद्गुरूंच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता व्यक्त केले .याप्रसंगी श्री.श्री.श्री. 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजीनी आपल्या आशीर्वाचनातून काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या धार्मिक, शैक्षणिक, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाचा ठसा भारत व भारताबाहेर उमटविलेले आहेत असे गौरव उद्गार काढले. यापुढे म्हणाले की ,वीरशैवाचा पवित्र धर्मग्रंथ सिद्धांत शिखामणीवर आधारित सर्वसामान्य भक्तगणासाठी साध्या व सोप्या भाषेत जन्म हा अखेरचा* महान पवित्र ग्रंथ लिहून पूर्ण केला.आज सिद्धांत शिखामणी या पवित्र ग्रंथाचे जवळपास 19 भाषेत भाषांतर करण्यात आलेली आहे.आज काशीपीठचे अनेक भक्तगण रशिया,युक्रेन इत्यादी देशात कार्यरत आहेत. ही गोष्ट आम्हा भारतीयांसाठी गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे. जेष्ठ जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीना 78 व्या वाढदिवसानिमित्त समस्त भक्तगणाकडून शुभेच्छा देऊन ऋण व्यक्त करण्यात आले.
महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्वच भक्तगणांना महाप्रसादाची सोय करण्यात आलेली होती .महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र मधून असंख्य भक्तगण आज दिवसभर मठामध्ये येऊन विशेष दर्शनाचा लाभ घेतला.