सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांची 'असेंचर' या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये मुजाहिद कोंडा आणि नुस्ताफा मासुलदार या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना वार्षिक ४.५ लाख पॅकेज मिळाले आहे,
अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत प्लेसमेंट होणे तितकेच महत्वाचे आहे. सोलापूर सिंहगड कॉलेज मधून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्लेसमेंटसाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टीचे अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांकडून प्रशिक्षण देण्यात येत असते. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी खूप मोठा फायदा होत आहे.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे व तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.