पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री आरविंद केजरीवाल यांच्या वाढिदवसाचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील जिल्हा परीषद शाळेतील पहीलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हा महासचिव सतीश लोंढे, आपचे सदस्य तथा ग्रमपंचायत सदस्य विशाल शेंडे, तालुका उपाध्यक्ष शंकर रोकडे, बाळासाहेब कदम, किशोर काकडे, विजय कदम, रविंद्र बिस्कीटे, योगेश भोसले, निलेश कदम, विक्रम कदम, सागर बिस्कीटे, बबलु कदम, नितीन कदम यांच्यासह आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब कदम यांनी आपच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रम, भ्रष्टाचार मुक्ती जागृती, विकासात्मक समाजकारण याबाबत माहिती देवून सत्य मार्गावर चालण्याचा संदेश तरूणाई दिला.