सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) जन्मदिवस २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल संगमेश्वर कॉलेजचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे व उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांना लायन्स क्लब व्टिन सिटीचा पुरस्कार जाहीर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २९ ऑगस्ट वार गुरवार सकाळी १० वाजता संपन्न झाला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे सोलापूर महानगरपालिका क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप,लायन पदाधिकारी नंदिनी जाधव,झोन चेअरमन मुकुंद जाधव, डिस्ट्रिक्ट हॉटेल मॅनेजमेंट कॅबिनेट ऑफिसर, डिस्ट्रिक्ट शिक्षण कॅबिनेट ऑफिसर नागेश बुगडे, लायन अध्यक्ष ज्ञानेश्वर कुलकर्णी ,लायन सचिव सोमशेखर भोगडे लायन खजिनदार प्रभाकर जवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल , हार, बुके असे आहे.तरी या पुरस्कार सोहळ्यास क्रीडा संघटक,क्रीडा प्रेमी, क्रीडाशिक्षक, यांची उपस्थितीत होती.