शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा कर्तृत्ववान युवा नेतृत्व अभिजित पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शेळवे येथील सणराईज पब्लिक स्कूल येथे विविध सहशालेय व जिल्हास्तरीय उपक्रम घेण्यात आले,सर्व विद्यार्थी व उपस्थित प्रशालेचा स्टाफ,पालक परिवार तसेच ग्रामस्थांच्या वतीने सन्माननीय चेअरमन अभिजित पाटील यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमासाठी शेळवे गावचे माजी सरपंच तुकाराम गाजरे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेळवे गावचे उपसरपंच किरण दादा गाजरे,प्रमुख उपस्थिती म्हणून खेड भाळवणी गावचे उपसरपंच शहाजी पाटील, युवराज साळुंखे,उत्तम गाजरे,अरुण गाजरे,गोपाळ गाजरे,दिपक लोकरे,बालाजी सप्ताळ, समर्थ गाजरे,उत्तम दुपडे, महेश कुसुमडे,दादासाहेब पांडव इत्यादी मान्यवर,तसेच सर्व स्टाफ,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सकाळच्या सत्रात सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले,तसेच पर्यावरण समतोल रहावा म्हणून वृक्षारोपण करण्यात आले,प्रशालेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक संदेश देणाऱ्या सुबक रांगोळ्या पाहून मान्यवर खुश झाले,त्यानंतर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला सुरवात झाली,चित्रकला, निबंध,रांगोळी तसेच वक्तृत्व अशा चारही स्पर्धांमध्ये एकूण चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्या सर्व स्पर्धांचे निकाल रविवारी सकाळी प्रदर्शित करण्यात येणार आहेत,तसेच सर्व स्पर्धांचे बक्षिस वितरण सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा प्रशालेत होईल अशी माहिती प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरे यांनी दिली.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे, संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे,उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड,राम मोकळे,संगीत विशारद योगेश गायकवाड,कबीर शेख, उपक्रमशील शिक्षिका सौ.दिपाली कुंभार,मनिषा गोरे,प्रियंका गाजरे, सोनाली गायकवाड,अश्विनी यलमार,ऐश्वर्या भाईक,हर्षदा पन्हाळकर, तृप्ती कोरे, अस्मातारा शेख,सिरतआरा शेख,सौ.भिंगारे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले...
शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.