माढा प्रतिनिधी तेज न्यूज
माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील मौजे.व्होळे येथे खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचा गावभेट दौरा संपन्न झाला.
या वेळेस खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले या मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. जिथे पाणी आहे तिथे लाईट उपलब्ध नाही त्यामुळे पाणी असून देखील गावाची तहान भागवण्यासाठी वनवन करावी लागत आहे.इथल्या लोकप्रतिनिधी मुलभूत गोष्टींकडे देखील दुर्लक्ष केलेले आहे. आशा निष्क्रिय लोकप्रतिनिधींना पदावर राहण्याचा अधिकार नाही येत्या विधानसभेला जनता निश्चितच परिवर्तन घडून आणेल यात शंका नाही.
तसेच गावात आल्यानंतर महावितरण अधिकारी यांना फोन करून लाईट व्यवस्था सुरळीत करण्याची सुचना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.
याप्रसंगी शिवतेजसिंह मोहिते-पाटील, तुकाराम यमगर,युवराज होळकर,डॉ.अनिल क्षीरसागर,भाऊसो कोळवले,अनिल भुसनर,आनंद भुसनर,सतीश लोंढे,अरुण विभुते,सतीश होळकर, राजकुमार होळकर,बाळू क्षिरसागर,दत्तात्रय चौगुले, दिलीप होटे, रघुनाथ पिसे,आनंद लोंढे व ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.