अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सोमनाथ मंदिर भाळवणी (तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर) येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी 10 व्या वर्धापन दिनानिमित्त दीपक जीवन बाबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तिसरा श्रावणी सोमवार आणि दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून रुद्राभिषेक, श्री शांतवन, आरती, शिवभजन, महाप्रसाद, शिवसंचार, संकट निवारण व बेल वाहणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
या धार्मिक सोहळ्यासाठी प्रचारक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, श्री सोमेश्वर मंदिर चांदज येथील भीमराव खंडू लोंढे, आकाश भीमराव लोंढे महाराज, गणेशगाव येथील दरबाराचे सर्वेसर्वा दिगंबर बाबर महाराज, यांच्यासह विविध ठिकाणाच्या दरबारातून आलेले प्रमुख भक्तगण तसेच समर्थ मदन गावडे, वेदमूर्ती नितीन विलास मार्डीकर, वासुदेव सावंत, मोफत पाटील, अज्ञान पाटील, दत्तात्रय सावंत, सचिन वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
तांदूळवाडी येथील श्री सोमेश्वर दरबाराचे सर्वेसर्वा किसन गायकवाड महाराज आणि त्यांचे सहकारी, दिलीप लोखंडे, बाळासाहेब कसबे इत्यादींनी श्री सोमेश्वर विनवण्यांचे सादरीकरण केले.