गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा यावेळी नाम उल्लेख करण्यात आला शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी येऊनही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर साहित्यिक व लोकशाहीर ही पदवी मिळवली असे मत संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी सहशिक्षक वर्षा मोरे, शितल मस्के, लिना बागल, शितल बागल ,मसरुद्दीन पटेल, राजेंद्र मोलाणे, सीमा रकटे, पोर्णिमा साठे, दीपक देशमुख सोमनाथ भोईटे संतोष पवार नियाज मुलांनी अजय मोरे व विद्यार्थी उपस्थित होते.