प्रतिबंधीत गुटखा वाहतूक करणारे दोन आरोपीसह वाहन ताब्यात 21 पोती हिरा गुटखा व वाहन असे 7 लाख 26000/हजार चा मुद्देमाल जप्त सिंघम पोलीस अधिकारी मनोज पवार यांची दबंग कारवाई
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर चे पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण, अतुल कुलकर्णी यांनी सोलापुर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी सणउत्सव व विधानसभा निवडणुक चे अनुषंगाने अवैध
धंदयावर कारवाई करण्या बाबत आदेशीत केले होते. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने मंद्रुप पोलीस ठाणे नवनियुक्त सहा. पोलीस निरीक्षक मनोज पवार, यांनी पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयावर कारवाई
करण्या बाबत सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक २४/०८/२०२४ रोजी रात्री पोकॉ/१०२१ रोहन पवार पोकॉ/७७९ दिनेश पवार पोकॉ/६३५ महांतेश मुळजे यांना पोलीस ठाणे हद्दीत हायवे पेट्रोलींग ड्युटी नेमण्यात आली होती सदर अंमलदार हे रात्रीचे सुमारास महामार्गावर सरकारी वाहनाने हायवेवर पेट्रोलींग करत असताना त्यांना बातमीदार मार्फत एक वाहन विजापुर कडुन सोलापुर कडे अवैध गुटखा वाहतुक करीत येत असल्याची बातमी मिळताच सदर अंमलदार हे तात्काळ नांदणी टोल नाका येथे पहाटेचे सुमारास जावुन थांबले काही वेळाने सदरचे वाहन विजापुरच्या दिशेने येत असल्याचे दिसले सदर वाहनास डयुटीवरील अंमलदार यांनी हाताचा इशारा करून थांबविले सदर वाहनाची तपासणी करता त्यामध्ये २१ पांढ-या रंगाचे गोण्यामध्ये १२६०००/-रू किमंतीचा हिरवा गुटखा नावाचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला मिळून आला वाहन चालक व त्यासोबत असलेल्या इसमास नांव गांव विचारता त्यांनी १) चालक, सोहेल मुर्तुज कुरेशी वय २३ वर्षे रा. कुरेशी गल्ली हजीमाही चौक सोलापुर व त्याचा साथीदार २) अकील मोहम्मद सलीम शेख वय ३२ वर्षे, रा. जोडभावी पेठ मंगळवार बाजार सोलापुर असे असल्याचे सांगीतले सदर वाहन व मिळून आलेले दोन इसम यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन तात्काळ सहा. आयुक्त अन्न व प्रशासन विभाग सोलापुर यांना कळविण्यात आले त्याप्रमाणे अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे, यांनी सदर वाहनाची व त्यामधील प्रतिबंधीत हिरवा गुटखा मालाची तपासणी करून ६०००००/-रू किमंतीचे टाटा पंच एम.एच.१३ इ.सी.८३९३ ग्रे. कलर व १२६०००/-रू किमंतीचा हिरा गुटखा असे एकुण ७,२६,०००/- रू किमंतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून वरील दोन इसमाविरूध्द मंद्रूप पोलीस ठाण्यात अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीस न्याय संहीता कलम २२३, २७४, २७५, १२३ व अन्न सुरक्षा व मानदे का. कलम २६ (२), २६ (२) (i), २६(२) (ii) २६(२) (iv), २७(३) (E), ३०(२) (A) ५९ अन्वंये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील दोन आरोपीना गुन्हयाचा तपास कामी अटक करण्यात आली असुन न्यायालयात हजर केले असता गुन्हयातील आरोपीतांना दिनांक २८/०८/२०२४ पर्यंत ०४ दिवस पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राजु डांगे मंद्रुप पोलीस ठाणे हे करत आहेत.
सदरची कामगीरी हि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापुर विभाग संकेत देवळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार मंद्रुप पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, आर.एल. डांगे, पोलीस अंमलदार अंकुश मोरे, रोहन पवार, दिनेश पवार व महांतेश मुळजे यांनी बजावली आहे.