सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की उपेक्षित अनुसूचित जातीतील थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केलेले असून अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेले साहित्याचा खजिना हा अनमोल असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल विदेशातील रशिया सरकारने देखील घेतलेली आहे मात्र आपल्या देशाने व राज्य शासनाने त्यांना उपेक्षित ठेवलेले असून 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे तरी मुख्यमंत्री महोदयांनी 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी जेणेकरून साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजातील सर्व शासकीय व नीम शासकीय कर्मचाऱ्यांना
या आनंद उत्सवात सहभागी होण्यासाठी दिनांक १ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात असून त्यांच्या जयंतीदिनी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी.अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.