मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबईतील नामांकित बड्या अंजुमन इस्लाम शाळेने बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल नावाची बोगस शाळा चालवून पालक-विद्यार्थी तसेच शासनाची फसवणूक केल्या संबंधी संस्थेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य बालहक्क सरंक्षण आयोगाने शिक्षण निरीक्षक दक्षिण मुंबई यांना दिले तसेच शाळेच्या मुख्याद्यापकांना हि ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी तक्रार दाखल केल्यावर हि कारवाई करण्यात अली आहे.
काय आहे प्रकरण
शाळेच्या प्रथम दर्शनी भागात, दैनंदिनी, वेबसाइट, प्रवेश प्रक्रिया संबंधी जाहिराती वरून शाळेचे माजी पालक श्री जाहिद इद्रिसी यांना अंजुमन-आय-इस्लाम संस्था बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल नावाची बोगस शाळा चालवत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी या बाबत शिक्षण निरीक्षक दक्षिण मुंबई कार्यालय कडे विचारणा केल्यावर त्यांना असे सांगण्यात आले कि अंजुमन-आय-इस्लाम हि संस्था चालवत असलेल्या कुठल्याही शासन मान्य शाळांपैकी पैकी बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल नावाच्या शाळेची नोंद शालेय शिक्षण विभागाच्या मान्यतेत व यू-डायस मध्ये नाही, जाहिद इद्रिसी यांना हि बाब समजल्यावर त्यांनी अंजुमन- आय इस्लाम संस्था हि अंजुमन आय इस्लाम हायस्कूल या मान्यता प्राप्त शाळेचा फक्त सरकारी दस्तावेजांवर उपयोग करते पण प्रत्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी उर्द हाय स्कूल या नावाने शाळा चालविली जाते अशी तक्रार शिक्षण खात्या कडे केली होती व सखोल चौकशी ची मागणी सन २०१९ मध्ये केली होती ,तत्कालीन शिक्षण उपनिरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी चौकशी केल्यावर शाळेच्या तत्कालीन मुख्याद्यापिका श्रीमती सबिना झवेरी यांनी आम्ही नजरचुकीने विद्यार्थ्यांच्या निकालांवर बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल असे नाव छापले अशी कबुली दिली, तसेच बद्रुद्दीन तय्यबजी हे आमचे संस्थापक सदस्य असल्याने त्यांचे नावाचा आदर म्हणून नाव इमारतीच्या प्रथम दर्शनी भागास प्रदर्शित केल्याचे सांगितले व शिक्षण खात्याची माफी मागितली आणि शिक्षण विभागाने देखील हे प्रकरण दडपून टाकले पालक जाहिद इद्रिस यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांची दाखल घेतली नाही म्हणून हि बाब ईद्रीसी यांनी महासंघाचे नितीन दळवी यांच्या निदर्शनास आणून दिली.
तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती सबिना झवेरी यांनी नजर चुकीने बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल हे नाव छापल्याची कबुली देऊन माफी मागितल्यावर हे प्रकरण दडपल्या बद्दल तसेच संस्थेला पाठीशी घातल्याबद्दल तत्कालीन शिक्षण निरीक्षक श्री राजेंद्र अहिरे व उपनिरीक्षक श्रीमती रंजना राव यांच्यावर कारवाईची मागणी महासंघाचे नितीन दळवी यांनी केली आहे, तसेच जर मुख्याध्यापिकेने बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल या शाळेचा उल्लेख निकालांवर नजरचुकीने केला असल्याचे कबुली सन २०१९ मध्ये दिली असताना व माफी मागितली असताना आजतायागत अंजुमन इस्लाम संस्था बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल या बोगस शाळेचे अनुदानित शाळा म्हणून उल्लेख संस्थेच्या वेबसाइट वर का प्रसारित करते? २०२४-२५ च्या शैक्षणिक दैनंदिनीत देखील बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल या शाळेचा उल्लेख करत आहे, याचाच अर्थ अंजुमन इस्लाम हि संस्था बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल नावाची बोगस शाळा चालवत असल्याचे सरळ स्पष्ट होते व असे करून संस्था पालक विद्यार्थ्यांची फसवणूक तर करत आहेत पण बोगस शाळा चालवून शिक्षण विभागाची हि फसवणूक करत आहे,तसेच बद्रुद्दीन तय्यबजी उर्दू हायस्कूल या बोगस शाळेच्या नावाने सन २०१५ ते २०१९ पर्यंत १० वि उत्तीर्ण झालेल्या किती विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले दिले गेले याची चौकशी करावी अशी मागणी महासंघाचे नितीन दळवी यांनी शिक्षण विभाग व बालहक्क आयोगास केली आहेच.
पण बोगस शाळेचे नाव संस्थेने वेबसाइट वर प्रसारित केल्या बद्दल संस्था चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे मागणी मुंबई पोलीस आयुक्त व गृह विभागाकडे केली आहे.