सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आमच्या सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर शाळेत इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या विद्यार्थी परिषदेच्या सदस्य निवडणूकीत हेड बॉय, हेड गर्ल, कल्चरल कॅप्टन, कल्चरल व्हाईस कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन, स्पोर्ट्स व्हाईस कॅप्टन या पदांसाठी उमेदवार निवडण्यात आले.
निवडणुकीचे उद्दिष्ट
विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व समजावे, निवडणुकीची प्रक्रिया अनुभवता यावी आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी त्यांना तयार करणे हे या निवडणुकीचे उद्दिष्ट होते.
निवडणुकीची प्रक्रिया
निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित नियोजन केले. यामध्ये खालील टप्पे समाविष्ट होते:
मतपेटी (Ballot Box): मतदानासाठी खास मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली.
ओळखपत्रांची पडताळणी (Verification of ID Proof): मतदान करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ओळखपत्रे तपासली गेली.
तर्जनीवर खूण (Marking on Index Finger): मतदानासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्जनीवर शाईची खूण करण्यात आली.
मतपत्र
(Ballot Paper): मतपत्रावर सर्व इच्छुक उमेदवारांची नावे होती. विद्यार्थ्यांनी आपल्या पसंती उमेदवाराच्या नावासमोर एस.पी.एस (SPS) चा शिक्का मारून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणूकीमध्ये शाळेच्या हेडबॉय साठी स्मित राठोड, प्रणव क्षीरसागर, ऐनेश रमावत आणि समर्थ शिंदे हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. हेड गर्ल या पदासाठी तीन विद्यार्थिनी उभ्या होत्या श्रेया बिरादार, संस्कृती दहिभाते आणि आदिती ढोले तसेच कल्चरल कॅप्टन साठी आयुष व्यवहारे, अवधूत भानवसे, प्रज्वल गुंजे, मोहित पांडे, कल्चरल वाईस कॅप्टन साठी नीता भडंगे, साक्षी पाटकर, सलोनी गाडे, अक्षता जाधव, चैतन्या गायकवाड तसेच स्पोर्ट्स कॅप्टन साठी पृथ्वीराज देशमुख, हर्षद गायकवाड, अनुश उरणे स्पोर्ट्स वाईस कॅप्टन या पदासाठी राजनंदिनी जाधव, कल्याणी शिंदे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते .
शाळेच्या प्राचार्या सौ. निखहत शेख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व आणि त्यांच्या अधिकाराची जाणीव होते.
विद्यार्थ्यांचा उत्साह
विद्यार्थ्यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिसादामुळे शाळेतील वातावरण आनंददायक झाले होते आणि या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची ओळख झाली आणि त्यांना मतदानाचे महत्त्व समजले.
संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले, प्राचार्या श्रीमती. निखहत शेख, उपप्राचार्य श्री. प्रकाश नवले आणि शिक्षकांनी देखील आपल्या मतदानचा हक्क बजावला आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . विद्यार्थ्यांनी निवडणुकीत दिलेल्या .