सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या सन 24-25 सालाकरीताअध्यक्षपदी लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी, सचिवपदी लायन सोमशेखर भोगडे, खजिनदारपदी लायन प्रभाकर जवळेकर, प्रथम उप्पाध्यक्षपदी लायन गणेश दंतकाळे तसेच लायन्स क्लब प्रांत 3234 डी-१ डिस्ट्रिक्टच्या वतीने लायन नंदिनी जाधव यांची झोन चेअरमन नियुक्ती करण्यात आली.
तसेच सर्व सन्माननीय लायन सदस्यपदी निवड क्लबचे विद्यमान अध्यक्ष लायन रविकिरण वायचळ यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.
लायन रविकिरण वायचळ यांच्या हस्ते नवनिर्वाचित झोन चेअरमन,अध्यक्ष, सचिव, खजिनदार इतर सन्माननीय लायन सदस्यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जेष्ठ लायन सदस्य एम जे एफ माजी प्रांतपाल डॉ नारायणदास चंडक, लायन माजी अध्यक्ष नागेश बुगडे, एम. जे. एफ लायन ममता बुगडे,एम.जै एफ लायन डॉ राहुल चंडक, माजी अध्यक्ष लायन मुकुंद जाधव,माजी अध्यक्ष लायन सागर पुकाळे इतर सर्व सन्माननीय सदस्याची उपस्थिती होती. या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.