गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी मार्गदर्शन केले .शाहू महाराजांचे असणारे योगदान त्यांचे असणारे कर्तुत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले . आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजश्री शाहू महाराज त्याचबरोबर वस्तीग्रहाची संकल्पना प्रथमता अमलात आणणारे असे थोर समाज सुधारक शाहू महाराज यांच्या कार्याचा यावेळी जयजयकार करण्यात आला.
यावेळी प्रशालेतील सहशिक्षक वर्षा मोरे ,शितल बागल ,लीना बागल ,सिमा रकटे, शितल बागल ,मसरुद्दीन पटेल, राजेंद्र मोलाणे, नियाज मुलाणी, संतोष पवार, दीपक देशमुख ,अजय मोरे व विद्यार्थी उपस्थित होते.