म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
स्केटिंग या प्रकारामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करून सुजल आप्पासाहेब माळवदे शिरवडे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे उद्गार नामदेव समाज शिंपी परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी काढले
बेळगाव कर्नाटक येथे नुकताच 76 तास वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या सुजल माळवदे यांच्या शिरवडे गावातील निवासस्थानी जाऊन नामदेव समाज शिंपी परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी इंजिनीयर सुधीर वरुडे ,म्हसवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते अहमद मुल्ला, पोपट बनसोडे ,रघुनाथ माळवदे, सुलोचना माळवदे आप्पासो माळवदे, अरुण माळवदे, निलेश जगदाळे, गणेश वेल्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना इंजिनियर पोरे म्हणाले सुजल माळवदे हा इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी असून त्याने बालवायातच केलेली कामगिरी अतिशय उत्तम असून शिरवडे गावाच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला आहेस परंतु शिंपी समाजाचे नाव रोशन केले आहे या पुढील काळात त्याने असेच रेकॉर्ड करावे त्याला जी काही मदत लागेल ती नामदेव समाज शिंपी परिषदेच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन देऊन सुजल माळवदे याच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुजल माळवदे कुटुंबियांनी नामदेव समाज शिंपी परिषदेचे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी आप्पासाहेब माळवदे यांनी आभार व्यक्त केले.