मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
नामांकित अंजुमन इस्लाम या संस्थेची सीएसटी येथील आलाना इंग्लिश सेकंडरी हाय स्कूल हि शाळा ईमारतीच्या ७ व्या मजल्यावर असलेल्या गच्चीवर ४ वर्ग भरवत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, पालक जाहिद ईद्रिसीनी विद्यार्थ्यांना होत असलेली बाब सन २०१९ मध्ये तक्रारी द्वारे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणुन देखील आजतगायत कारवाई झाली नसल्यामुळे पालकाने हि बाब महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांच्या कडे मांडल्यावर त्यांनी बालहक्क आयोगाकडे तक्रार केल्यावर या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा शुशिबेन शहा यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी चौकशी करण्याचे व शाळेत जर अतिरिक्त विद्यार्थी असतील तर दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला तर दिलेच पण शाळेच्या मुख्याध्यापकांना पण ७ दिवसात या वर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
७ व्या मजल्याच्या गच्चीवर विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे घेऊन जिन्याने चालत जावे लागते यामुळे विद्यार्थ्यांची दमछाक होते, गच्चीवर वर्ग बांधल्यामुळे छत म्हणून पत्र्याचे शेड बांधल्याने गरमीत पत्रे तापल्याने विद्यार्थ्यांना त्रास होतो, इमारतीला लिफ्ट आहे पण विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करण्यास मनाई आहे, गच्चीवर वर्ग बांधल्यामुळे, हे बांधकाम अधिकृत आहे कि नाही यावर प्रश्न निर्माण होतो, विद्यार्थी जास्तीत जास्त ४ मजल्या पर्यंत जिन्याने चालत जाऊ शकतात अन्यथा त्यांची दमछाक होते, मग या शाळेतील पाचव्या व सहाव्या मजल्यावर भरवण्यात येणाऱ्या वर्गांना शासनाची परवानगी आहे का? या शाळेच्या ईमारत सुरक्षेचे काय? या सर्व बाबींचा दखल घेऊन शिक्षण विभागाने चौकशी करून दोषी शाळा प्रशासनावर कारवाई करावी अशी महासंघाचे नितीन दळवी यांची मागणी आहे.