महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची स्थापना केली- सरकारी वकील संतोष न्हावकर
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
गुरूविद्या प्रतिष्ठानच्या वतीने जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने बसव मानद पुरस्कार वितरण समारंभ थाटात पार पडला.
या कार्यक्रमाचच्या अध्यक्षस्थानी सरकारी वकील माननीय श्री संतोष न्हावकर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणुन माननीय श्री दिपक आर्वे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त, माननीय श्री डॉ मंगेश शहा उपस्थित होते.प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतमिचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक उपाध्यक्षा सौ राजश्री तडकासे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा व पुरस्कारप्राप्त व्यक्तीचा परिचय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार यांनी करून दिला.व्यासपीठावर माननीय श्री संतोष न्हावकर सरकारी वकील, माननीय श्री दिपक आर्वे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त, माननीय श्री डॉ मंगेश शहा,संस्थापक , अध्यक्ष,श्री सातलिंग शटगार, उपाध्यक्षा सौ राजश्री तडकासे,श्री सोमशेखर ईरप्पा भोगडे, सदस्य श्री विजयकुमार भोगडे, सह सचिवा सौ रेणुका हब्बु, सल्लागार श्री मोहन भुमकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बसव मानद वितरण करण्यात आले. यावेळी पुरस्काराचे मानकरी श्री राजशेखर विजापूरे (बसव मानद बसव भुषण पुरस्कार), श्री राहुल अशोक भोगडे. ( मानद बसव रत्न पुरस्कार) श्री काशिनाथ कल्लाप्पा जंगलगी ( मानद बसव श्री पुरस्कार, सौ. रेखा नागराज बामणे (मानद बसव शरणी पुरस्कार), श्रीमती आरती सुभाष अकुशे( बसव मानद बसव माता पुरस्कार,संगिता आणि श्री अंबादास) गवळी ( बसव मानद बसव शरण दांपत्य पुरस्कार), सौ मयुरी आणि श्री मेहरू भवानी क्षेत्री (बसव मानद शरण दांपत्य, सौ निता - चित्तरंजन शहा -पुरस्कार), तसेच सौ श्रीदेवी यळमेली यांना लायन्स क्लब सोलापूर सिटी कडून बसव शरणी पुरस्कार आदीचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,शाल,हार,गुच्छ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे माननीय श्री दिपक आर्वे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त यांनी बसवेश्वर यांच्या वचनाबद्दल माहिती सांगुन जात,थर्म,वर्ण भेदभाव न ठेवता बसवेश्वराचे शिकवण आचरणात आणावे.आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे, प्रतिष्ठानचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.प्रमख पाहुणे यांनी माननीय श्री डॉ मंगेश शहा पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे कौतुक करून बसवेश्वराचे विचार आकलन करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षयी भाषणात माननीय श्री संतोष न्हावकर सरकारी वकील म्हणाले की महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात क्रांती केली, बालविवाह प्रतिबंध, कर्मकांड अंधश्रद्धा याला विरोध दर्शविला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिल्याचे सांगितले, त्यांनी 'काय कवे कैलास ची शिकवण दिली आहे,माजी अध्यक्ष प्रा.प्रभाकर नागणसुरे यांनी कर्यक्रमास शुभ संदेश पाठविले.यावेळी पुरस्काराथीं श्री अंबादास गवळी, श्री नेहरु क्षेत्री यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन सौ श्रीदेवी यळमेली यांनी केले तर आभार मोहन भुमकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे, सदस्य श्री दत्तात्रय जामदार, सदस्य श्री मंजूर शेख, सदस्या कु.प्रतिक्षा खंडाळकर.कुमारी नेहा भोगडे, नितीन भोगडे यांनी परीश्रम घेतले.