सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जिवंत राहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवाळी तसेच 1 मे महाराष्ट्र कामगार दिन अश्या वर्षातून चार वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रानां पाच हजार रुपये प्रमाणे वीस हजार रुपये प्रति वर्ष जाहिराती मिळायच्या सन 2018 पासून राज्य सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राना जाहिराती देणे बंद केलं आहे.
सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे जिकरीची झाले आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खच खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकाना डी टी पी व छपाई चा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत. समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाई चा खर्च त्याच बरोबर छोटया यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रानी माना टाकल्या आहेत राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिक पणे सेवा म्हणून समाज जागृती चे काम करत आहेत परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरत आहे.
राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्रव्यवहार केला असून राज्य सरकार ने यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने बुधवार दिनांक 22/5/2024 रोजी जिल्हा परिषद जवळ आंदोलन गेट या ठिकाणी सकाळी 11वाजता उपोषण करण्यात येणार आहे.
तरी या उपोषणास सोलापूर शहर व जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्र चे संपादक तसेच पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केले आहे.