सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गुरूविद्या प्रतिष्ठानच्या वतीने बसव जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आणि मानद पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्री सातलिंग शटगार यांनी पत्रकाव्दारे दिली.
सोलापूरात बसव जयंती गुरूविद्या प्रतिष्ठान वतीने सालावाप्रमाणे तीन दिवस साजरा करण्यात येत आहे.दि. १० मे रोजी बसव जयंती निमित्त कौतम चौक येथे सकाळी ८/३० वाजता बसवेश्वर पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
दि.१२ मे रोजी सोलापूरात विविध सोलापूर जिल्हा तॉयकॉन्दो स्पोर्ट्स कॉन्सिल वतीने क्रीडा शिबीर विजापूर रोड भागात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
दि. मंगळवार दिनांक १४ मे रोजी संध्याकाळी ठिक ६/१५ वाजता हॉटेल समॄध्दी सिध्देश्वर पेठ सोलापूर येथे समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तीना बसव मानद पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.यंदाच्या वर्षी एकूण नऊ जणांची निवड समितीने निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे मानकरी राजशेखर विजापूरे (बसव मानद बसव भुषण पुरस्कार), राहुल अशोक भोगडे. ( मानद बसव रत्न पुरस्कार) काशिनाथ कल्लाप्पा जंगलगी ( मानद बसव श्री पुरस्कार, सौ.आरती नागराज बामणे (मानद बसव शरणी पुरस्कार), श्रीमती आरती सुभाष अकुशे( बसव मानद बसव माता पुरस्कार,संगिता आणि श्री अंबादास) गवळी ( बसव मानद बसव शरण दांपत्य पुरस्कार), सौ मयुरी आणि श्री मेहरू भवानी क्षेत्री (बसव मानद शरण दांपत्य, सौ निता - चित्तरंजन शहा -पुरस्कार), तसेच सौ श्रीदेवी यळमेली यांना लायन्स क्लब सोलापूर सिटी कडून बसव शरणी पुरस्कार मिळाल्यामुळे विदेश सत्कार या सर्वाना दिपक आर्वे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त, डॉ मंगेश शहा यांच्या शुभहस्ते, संतोष न्हावकर माजी सरकारी वकील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक सोमशेखर भोगडे,अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार,उपाध्यक्षा राजश्री तडकासे,सचिवा श्रीदेवी यळमेली, माजी अध्यक्ष प्रा.प्रभाकर नागणसुरे,सल्लागार मोहन भूमकर, कार्याध्यक्ष नमिता थिटे, विजु भोगडे, व्यासपीठावर उपस्थितीत राहणार आहे.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे, सदस्य दत्तात्रय जामदार, सह सचिवा सौ रेणुका हब्बु, सदस्या सौ नर्मदा मिठ्ठा, खजिनदार सौ शिवलीला भोगडे, सदस्य श्री मंजूर शेख, सदस्या कु.प्रतिक्षा खंडाळकर.वरील सर्व कार्यक्रमास बसव भक्तणी उपस्थित राहावे असे प्रतिष्ठान सचिवा श्रीदेवी यळमेली यांनी आवाहन केले.