पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर येथील सौ. तेजश्री ऋषिकेश कुलकर्णी-बडवे व तिची कन्या चि. ओविली ऋषिकेश कुलकर्णी या मायलेकींनी एक मे महाराष्ट्रदिना निमित्त आसाम राज्यपालांच्या वतिने गुवाहाटी (काय झाडी काय ड्वांगर फेम गाव) येथे आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र गुजरात या सांस्कृतिक कार्यक्रमात चि. ओविली ऋषिकेश कुलकर्णी वय वर्ष ६ हिने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अभंगावर शास्त्रीय नृत्य केले तर तिच्या आईने म्हणजे सौ. तेजश्री ऋषिकेश कुलकर्णी हिने श्रीगणेशाच्या आरतीवर कथ्थक नृत्य केले. विशेष म्हणजे दोघी मायलेकींना उपस्थित प्रतिष्ठित रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा पाऊस पाडून मनापासून दाद दिली.
आसाम सरकारच्या वतीने आय पी एस अधिकारी धनंजय घनवट यांनी "Special mentions to little Ovilee who gave a hope to all that our cultural heritage is in safe hands of the next generation. " अशा शब्दांत कौतुक केले आहे.
हा कार्यक्रम राजभवन आसाम यांच्या वतीने Gujarath & Maharashtra Statehood Day या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र मंडळाच्या वतीने या मायलेकींचे विशेष कौतुक करण्यात आले. आसामच्या राजभवनात इतक्या लहान वयात आमंत्रित करण्यात आलेली ओविली ही एकमेव महाराष्ट्रातील कन्या असल्याने मायलेकींवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन्ही नृत्यांची कोरिओग्राफी सौ. तेजश्रीने केली होती. सौ. तेजश्री ही पंढरीतील कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांची कन्या आहे.