तिमिरातुनी तेजाकडे! अंध, दिव्यांग गायकांच्या भारतातील पहिल्या संगीत अल्बम चे प्रकाशन!
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
तिमिरातुनी तेजाकडे या अल्बम मधील 10 गीते महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींनी लिहिलेली आहेत व संगीतकार त्यागराज खाडिलकर यांनी उत्तम वाद्यवृंदासह स्वरबध्द केली आहेत. या अल्बममध्ये सुरेखा गावंडे यांचे लावणी गीत आहे.
बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री. शिवाजी मंदिर दादर, मुंबई येथे भव्य सोहळ्यात पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या शुभ हस्ते आणि प्रसिद्ध निर्माती, दिग्दर्शिका कांचन अधिकारी, हास्यजत्रा फेम अरूण कदम, विजय पाटकर, प्रमोद पवार, विनय येडेकर, जेष्ठ कलाकार मंजुश्री खाडिलकर आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थितीत या अल्बमचे प्रकाशन झाले.
सर्व रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रत्येक गाण्याला वन्स मोअर मिळत होता. तेजल व्यास या गायिकाने गायलेल्या सुरेखा गावंडे यांच्या लावणीला तर प्रेक्षकानी उचलून धरले. इतकेच नव्हे तर प्रेक्षकांतून एक नृत्यगांना करुणा कातखडे हिने स्टेजवर येऊन या लावणीवर नृत्य केले.या कार्यक्रमाचे आयोजन 'स्वरकुल ट्रस्ट'चे विश्वस्त त्यागराज खाडिलकर आणि डॉ. वीणा खाडिलकर यांनी केले.
अंध, दिव्यांग गायक:- अतुल कसबे, विकी दर्जी, आफताब ठाकूर, विजयालक्ष्मी यादव,तेजल व्यास,आरती बाविस्कर, सोनू मालधुरे , सानिका पाटील
गीतकार:- विजय जोशी-डोंबिवली,
प्रदीप पवार-टिटवाळा,
अरुण विघ्ने-वर्धा,
विलास देवळेकर-डोंबिवली,
डॉ.सुभाष कटकदौंड-खोपोली,
डॉ.बाळासाहेब तोरस्कर-कोल्हापूर,
डॉ.मितेश वेरुळकर-नागपूर,
डॉ.कैलाश कापडे-अमरावती,
सुरेखा गावंडे-कल्याण,
वाणी केरकलमट्टी-डोंबिवली
संगीतकार:-त्यागराज खाडिलकर
संपूर्ण कार्यक्रमात रसिक प्रेक्षक भारावून गेले होते. सर्व गायक आणि गीतकार यांना पदमश्री अनुराधा पौडवाल यांच्या शुभ हस्ते शाल, फुलगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ. वीणा खाडिलकर यांनी अतिशय सुंदर, भावपुर्ण शब्दात सर्वांचे आभार मानले.