सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित ळपपश्री सिध्देज्ञश्वर इंग्लिश मिडियम हायस्कूल चे वर्ष २०२३-२४ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवत शाळेच्या गौरव परंपरेत मानाचा तुरा खोवला आहे . यावर्षी विद्यार्थिनींनी बाजी मारत प्रशालेला १००% टक्के निकालाची गौरव परंपरा प्राप्त करून दिली आहे.
दहावीच्या परीक्षेत सुयश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थीनी कलशेट्टी सौंदर्या नागराज ९५.६०%, दुबे खुशी संतोष ९४.२०% नंदी सोनाली सुरेश ९३.६०% सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन धर्मराज काडादी, मा. डॉ.राजशेखर येळीकर, मा श्री भीमाशंकर पटणे, मा. श्री मल्लिकार्जुन कळके, मा. श्री गुरुराज माळगे ,मा. श्री. सि.बी नाडगौडा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. योगेश राऊत, सुपरवायझर श्री. शिवराज बिराजदार, ज्येष्ठ शिक्षिका मा रेणुका अरोरा, सौ. नीता तमशेट्टी , सौ सुधा उमदी सौ. वैशाली नाडगीर सौ.रजनी महाजन, सौ विजयालक्ष्मी नष्टे, सौ निलावती कचरे, कु.श्रुती कुलकर्णी यांनीही Strips विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. श्री. पवन भोसले यांचेही यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.