सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
"वन्य तितर पक्षी यास जाळी लावून तीन जिवंत व एक मृत पक्षी पकडले बाबत सोलापूर वनविभागाने आरोपी नामे भाऊराव हरिश्चंद्र सावंत रा. तळे हिप्परगा, उत्तर सोलापूर यास वन्यजीव संरक्षण कायदा कलम 9,39 सह 51 प्रमाणे दाखल गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे"
यातील थोडक्यात हकीकत अशी की दिनांक ३/०१/२०२२ रोजी यातील आरोपीने वन्यजीव तितर पक्षी मारले बाबत फिर्याद सोलापूर वनविभागाने दाखल केली होती यात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. मनोज गुंडे यांनी युक्तिवाद करताना मे. कोर्टास तथाकथित घटनेतील तसेच सोलापूर वन्य विभागाच्या तपासातील विसंगती पटवून देताना म्हणाले की सदरची घटना ही खाजगी क्षेत्रामध्ये झालेली असून सदरचे घटनास्थळाचे क्षेत्र हे वन्य विभागाच्या राखीव परिक्षेत्रातील व आरक्षित जागेतील नसून खाजगी मालकीच्या क्षेत्रात घडलेली आहे .हे पटवून दिले तसेच सोलापूर वनविभागाने सदरच्या गुन्हया तील तपासात मध्ये त्या घटनास्थळाच्या जमिनीचे मालक अथवा अन्य स्वतंत्र साक्षीदार तपासले नाहीत. यातील सर्व साक्षीदार वन्य विभागातील कर्मचारी असून प्रत्येकाने आपली साक्ष देताना आरोपीस अटक केले तारखेबाबत व न्यायालयात त्यास हजर केले बाबत वेगवेगळे कथन केलेले आहे. तसेच यातील तपास कामी कार्यरत व नेमणूक असलेले सोलापूर वन्यविभागातील कर्मचारी यांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असून त्यांना कोणत्याही प्रकारचे आदेश नसताना. सदरकामी कशी चुकीची कार्यवाही सोलापूर वनविभागा कडून केली गेली आहे.हे पटवून सांगीतले. यातील साक्षीदार तपासताना प्रत्येक साक्षीदारांनी महत्त्वाचे मुद्द्यावर बचाव पक्षाचे प्रश्नास होकारार्थी उत्तर दिले व यातील आरोपी भाऊराव सावंत असताना त्यातील वन्यविभाकडील एका साक्षीदाराने आरोपी भोसले यांनी पक्ष्याची शिकार केली केली असल्याचे व बातमी मिळाल्याचे चुकीचे व खोटे कथन केले आहे. परंतु प्रत्यक्षात अटक आरोपी वेगळेच आहेत
यात आरोपीचे जबाब नोंदवले चे कथन केले असताना समक्ष म्हणून कोणाचीही सही नसून त्यातील हस्ताक्षर स्वतःचे नाही असे उत्तर दिल्यामुळे आरोपीची निवेदन साबित झालेले नाही त्यामुळे सरकार पक्षाने आरोपी विरुद्धचे गुन्हा संशयापलीकडे साबित करण्यात आला नाही ही बाब युक्तीवाद करताना ॲड मनोज गुंडे यांनी संपुर्ण पणे कशी खोटी आहे हे प्रामुख्याने में कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले
व सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस आर सातभाई साहेब यांनी आरोपी ची निर्दोष मुक्तता केलेली आहे.
यात आरोपीतर्फे ॲड. मनोज गुंडे, ॲड शिवाजी कांबळे,ॲड एस एस रायचूरकर,ॲड.सौरभ जगताप यांनी काम पाहिले.