पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्पायना बायफिडा फाउंडेशन मुंबई , उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर , नवजीवन हॉस्पिटल पंढरपूर ,अग्रज हॉस्पिटल पंढरपूर , स्त्री आरोग्य तज्ञ संघटना पंढरपूर आय एम ए पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मजात दोष व व्यंग या आजारावरील निदान व उपचार शिबिर पंढरपूर येथील डॉ शितल शहा यांचे नवजीवन हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक २७/०४/२०२४ रोजी पार पडले या शिबिरामध्ये जन्मजात व्यंग असलेले एकूण ५१ बालके तपासले गेले व त्यांच्या पालकांना समुपदेशन व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले गेले . या शिबिरासाठी मुख्य अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर व डॉ संतोष करमरकर सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ स्नेहा सावंत, डायरेक्टर उमा काळेकर, डॉ शितल शहा सर, डॉ महेश तळपल्लिकर, डॉ एकनाथ बोधले डॉ सुनील कारंडे इ. उपस्थित होते .या शिबिरासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.महेश सुडके व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे , वैद्यकीय अधिकारी डॉ.कुलदीप डोके यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ.सुदेश दोशी अग्रज हॉस्पिटल पंढरपूर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. सदरील शिबिर डॉ. सुहास माने जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर, व डॉ. श्रीकांत कुलकर्णी बाह्य संपर्क अधिकारी जिल्हा रुग्णालय सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुरुषोत्तम कदम यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.सुधीर असबे यांनी केले.
याच कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणून दिनांक २८/०४/२०२४ रविवार रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये आय एम ए हॉल पंढरपूर येथे पंढरपुरातील सर्व डॉक्टरांसाठी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्रामध्ये मुंबई येथील सुप्रसिद्ध बालशल्य विशारद डॉ. संतोष करमरकर, सोलापूर येथील डॉ. महेश तळपल्लीकर , डॉ. सुमित चमारिया व पंढरपूर येथील डॉ सुदेश दोशी व डॉ.मंदार सोनवणे व पंढरपूर मधील नामवंत डॉक्टरांनी, तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला होता.