सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि. २३/०४/२०२४, रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जुनी मील बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती यांच्या मालकीच्या कंबर तलाव जवळील मोरारका बंगला, मोतीबाग या भागात तीन इसमानी अनधिकृत प्रवेश करून लिंबाच्या झाडाची वृक्षतोड करून एम एच १३ ए एन ४२८० या पिवळ्या रंगाच्या पिकअप रिक्षातून कापलेल्या झाडाच्या लाकडा सहित विकास नगर मागे मार्गे पलायन केले.
त्याची तक्रार ट्रस्टचे सचिव डॉ. संदीप आडके व दीपक पेंढारकर यांनी तात्काळ सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान कार्यालयाकडे पुराव्यानिशी केली आहे. शहरातील जुन्या मिल ट्रस्टच्या विविध जागांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून अशा प्रकारचे गैरकृत्य अथवा अतिक्रमण कोणी करत असल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल.याबाबतची तक्रार मा. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सुद्धा ट्रस्ट द्वारे करण्यात आलेली आहे अशी माहिती डॉ. आडके यांनी दिली आहे.