सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागातील विद्यार्थ्यांनी आय.आय.सी. अंतर्गत स्टार्ट उप/ इंनोव्हेशन साठी सोलापूर विद्यापिठामध्ये उद्यम इन्कुबेशन फाउंडेशन अंतर्गत एचडीएफसी , पीएसजी आणि एमएसएमई ३.० मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानिमीत्त झालेल्या वर्कशॉपमध्ये विविध स्टार्ट उप/ इंनोव्हेशन जसे गोफिग, कॅरी, फूड वेस्ट मॅनेजमेंट, सिंपलिसिटी सिविक कम्युनिकेशन या विषयांचा सामाजिक प्रॉब्लेम्स व त्यांचे सोल्युशन्स कसे केले जाते याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सिंहगड संस्थेचे सहसचिव श्री.संजय नवले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे आणि डॉ.शेखर जगदे, विभागप्रमुख डॉ .विजय बिरादार, प्रा. श्रीकांत जगताप, प्रा. एम. एच. नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. उद्यम प्रा. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रा. राजकुमार लांडगे, प्रा.काझी,प्रा. सुप्रिया कुलकर्णी उपस्थित होते.