सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरींग विभागामध्ये 'अल्ट्राटेक सिमेंट या सेंटर ऑफ एक्सेलेन्सचे' उद्घाटन सिंहगड संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ.सुनंदा नवले मॅडम व अल्ट्राटेक सीमेंटचे झोनल हेड श्री. अरविंद महाजन, यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी सिंहगड संस्थेच्या उपाध्यक्ष (प्रशासन) रचना नवले मॅडम, अल्ट्राटेक चे हेमंत जैन, शीतलराज सिंदखेडे, सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, सिव्हिल विभागप्रमुख डॉ. प्रदिप तपकीरे, अल्ट्राटेकचे बाळकृष्ण कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सोलापूरातील नामांकित स्ट्रक्चरल डिझायनर, प्रॅक्टिसिंग इंजिनिअर, बिल्डर्स डेव्हलपर, डीलर्स, कॉन्ट्रॅक्टर, वेगेगळ्या संस्थेतील सिव्हिल विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे प्रयोजन भारतातील २५० संस्थापर्यंत पोहचले असून ह्या पंचक्रोशिमध्ये प्रथमच हा प्रयोग करण्यात आला असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. सिव्हिल केडरमधील सर्व स्तरातून ह्या नावीन्यपूर्ण कल्पनेचे स्वागत करण्यात येत आहे. ही फक्त सुरवात असून ह्या माध्यमातून अनेक स्तरापर्यंत पोहचण्याचा सिंहगड महाविद्यालय आणि अल्ट्राटेक यांचा मानस आहे असेही यावेळी श्री. महाजन यांनी नमूद केले.