मुंबई प्रतिनिधी उदय वाघवणकर
विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालयात वंचित बहुजन आघाडी अंतर्गत रिपब्लिकन युनियनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
रिपब्लिकन युनियन मुंबई मंडळ- ३ अध्यक्ष / शरद नामदेव बनसोडे यांनी यावेळी अध्यक्षपद भूषविले.तसेच प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सोनावणे यांनी महापुरुषांबद्दल भाषण केले.रिपब्लिकन युनियनचे अखिल भारतीय अध्यक्ष हेमंत बेले, सरचिटणीस रवी कांबळे, मुंबई मंडळ ३ चे सरचिटणीस राजेंद्र अहिरे व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.