सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भोगडे गल्लीतील कसबा देवीची कसबा परिसरातील कसबादेवी ची स्थापना दोनशेहून अधिक वपूर्वी झाली असून मूळ मूर्तीची झीज सल्यामुळे आता नव्याने महिषासुर दिनीच्या रूपातील ३१ इंच उंचीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.धार्मिक विधीस सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. सायंकाळी मल्लीकाजुन॑ मंदिरापासून बाळीवेस, चाटीगल्ली, सराफ बाजार, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, मसरे गल्ली, होटगी मठ उत्तर कसबा, हिरेहब्बू मठ,गंवडी गल्ली भोगडे गल्ली येथे विसर्जित करण्यात आली.जलकुंभधारी५५० महिलांसह, मिरवणूक मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती.
मिरवणुकीत सुरूवातीला हलगीचा कडकडाट पछरंगी झेंडा, घोडे, उंट, बंग्गी, बॅण्ड पथक, कसबा देवी मुर्तीं ट्रॅक्टर वर सजवण्यात आली होती. यावेळी मिरवणुकीत सौ शोभा बन्नशेटी, सुचित्रा थंळगे,प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, विप्पीन धुम्मा, विजयकुमार भोगडे, तम्मा मसरे, सुनील मसरे,आवजे, संदेश भोगडे, सुधीर थोबडे आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.मुख्य सोहळा बुधवारी होणार आहे.
नवीन मूर्ती गदगहून तयार करून घेण्यात आली आहे. महिन्यांपासून मूर्ती तयार करण्याचे श्रम गदग येथे सुरू होते. जुन्या मूर्तीची लापना मंगळवारी मंदिरात होणार हे त्यावर नवीन मूर्तीची स्थापना काशिपीटाचे श्री श्री श्री १००७ जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी च्या हस्ते ब्राम्ही मुहूर्तावर मूर्ती संस्कार, व काशी जगद्गुरु महास्वामी यांच्या अमृत हस्ते कसबादेवीमूर्ती प्राणप्रतिष्ठांपना कळसारोहनण, पूणा॓हुती व धर्मसभा आयोजित करण्यात आले आहे. यावेळी श्री.ष. ब्र तपस्वी वीरभद्र शिवाचार्यस्वामी( रेवणसिध्देश्वर सिध्दाश्रम कडगंची सोलापूर), श्री ष ब्र श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी (नागणसूर), ह. भ .प. गहिनीनाथ महाराज (औसा संस्थान व श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर सहअध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
भाविकांनी सोहळ्यात सहभागी व्हावे. रोज महाप्रसादाची सोय आहे. याबाबत अध्यक्ष कैलास भोगडे नियोजन करीत आहेत. उपाध्यक्ष सुनील मसरे अम्यासाहेव बिराजदार, कैलास भोगडे, कार्याध्यक्ष भारत सुरवसे, शिवलिंग भोगडे, सोमशेखर ईरप्पा भोगडे,ओमप्रकाश भोगडे, रमेश भोगडे, दीपक बिराजदार आदी पदाधिकारी, सदस्य यांनी सेवा करत आहेत.
यामंदिराची आख्यायिका काय, फिरकी देवी का म्हणता कसबादेवी म्हणून देवीचा महिमा आहे. कसबादेवीस (फिरकी अंबाबाई) म्हणतात पूर्वजांनी सांगितल्यानुसार देबी सारखी जागा बदलून भक्तांसाठी धावून जायची. सारखी जागा बदलल्यामुळे जुन्या काळी फिरकी अंबाबाई माणत असत. तेच नाव आजही सांगतात. या आठवणी जुन्ना काळातील आहेत, अशी माहिती मंदिराचे संचिव सचिन म्हेत्रे यांनी दिली. तसेच उद्या १ मे रोजी सकाळी ८/०० वाजता भक्तांनी उपस्थित राहावे. असे आव्हान अध्यक्ष, सचिव यांनी केले.