सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील वकील संघाची अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ८ ते सांय. ७ या वेळेत मतदान शांतेत सुरू झाले आहे. संपूर्ण देशभर ईव्हीएम मशीन की बॅलेट पेपर यावर प्रचंड प्रमाणात वादविवाद सुरू आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता.या बाबत अनेक याचीका दाखल करण्यात आल्या होत्या.त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २६ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण निकाल देऊन ईव्हीएम मशीन ला पसंती दिली आहे. तो प्रश्न निकाली केला आहे.
असाच वाद यंदा काही वकिलानी ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्याची मागणी केली होती.याबाबत निर्णय घेण्यासाठी वकिलाच्या विशेष सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते.परंतु त्यामध्ये ज्येष्ठ वकील तसेच काही ज्युनिअर नवोदित वकील सदस्यांनी मात्र बॅलेट पेपर हेच विश्वासार्ह माध्यम असल्याचे सांगत वकील संघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बॅलेट पेपर द्वारेच घ्यावी असा जोर धरला होता .त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड .सुरेश गायकवाड व बार आसोसिएशनचे कार्यकारी मंडळ यानी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेण्यास पसंती दिली होती.त्यानुसार आता बॅलेट पेपर वरच ही निवडणूक सुरू आहे.
देशभरातील सर्वसामान्य मतदारांकडून ईव्हीएम मशीन वर आजही शंका व्यक्त होत असताना न्याय प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या वकीलानी मात्र ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरला पसंती दिली आहे. ही विसंगती आजही सर्वसामान्य लोकांना विचार करायला लावत आहे.
थेट बार रूम मधून
सर्व वकिल सदस्याना सूचना देण्यात आल्या आहेत.आज सोमवार दिनांक 29 एप्रिल2024 रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळी ८ ते ८.३० या वेळेत 75 मतदारानी मतदानाचा हक्क बजावला तर सकाळी 8 ते 10 या पहिल्या दोन तासांमध्ये तब्बल २५५ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण मतदारांची संख्या १८३१ इतकी आहे . सध्या मतदान शांततेत सुरू आहे.