"तिरंगी लढतीची शक्यता "
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर वकील संघाची वार्षिक निवडणूकीसाठी येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. लढतीचे चित्र 22 तारखेला स्पष्ट होणार आहे. आत्तापर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव ,सहसचिव,व खजिनदार अशा पाच पदाकरिता 21 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.( याची यादी सोबत दिली आहे)
अध्यक्ष पदाकरीता आमित तळंगे, एस व्ही उजळंबे, राजेंद्र फताटे व एस आर रेशमी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तथापि यामध्ये एस.आर.रेशमे हे निवडणूक रिंगणातून बाहेर माघार घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वकील संघाची लढत ही तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने परिपूर्ण तीन पॅनल तयार झाले असून प्रचारात देखील त्यांनी रंगत आणली आहे.उमेदवाराकडून प्रत्यक्ष भेटीगाठी सह गृह भेटीवर भर दिला जात आहे.अमित आळंगे याचा विधी सेवा पॅनल, एस .व्ही. उजळंबे हे विधी सेवा व्यासपीठ तर राजेंद्र फताटे यांचा परिवर्तन पॅनल अशा माध्यमातून प्रचार जोरदार सुरू आहे दि..23 एप्रील रोजी अंतिम उमेदवाराची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
या करिता मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.सुरेश गायकवाड विशेष निवडणूक अधिकारी व्ही.सी.दगड, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अविनाश काळे हे परिश्रम घेत आहेत.