उदय वाघवणकर - जोगेश्वरी प्रतिनिधी
विक्रोळी लिंक रोडवरील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब मनपा ट्रॉमा केअर रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (I.C.U) हा मागील काही दिवसांपासून बंद आहे.या विभागात काम करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांचे वेतन न दिल्यामुळे डॉक्टरांनी सेवा देणे बंद केले आहे.यापूर्वी सुद्धा असा प्रकार घडला होता.त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली होती.
अगदी मोक्याच्या ठिकाणी हे रुग्णालय असल्याने उपनगरातील असंख्य रूग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात.अशात अतिदक्षता विभाग बंद असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत.नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने मुंबई महानगरपालिकेत सध्या आयुक्त हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत.
त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरल्याचे चित्र आहे.ट्रॉमा केअर रुग्णालयातील या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.अतिदक्षता विभागाचे कंत्राट असलेल्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.