सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेले ॲड. आनंद प्रल्हाद काळे यांची भारत सरकार नोटरी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे सुरुवातीच्या काळात त्यांनी खाजगी वकील म्हणून फौजदारी व दिवाणी क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. विधी क्षेत्रामध्ये गेली वीस वर्षापासून कार्यरत आहेत.
ॲड. आनंद प्रल्हाद काळे हे सोलापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी सहसचिव म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. सोलापूरातील दिवाणी व फौजदारी क्षेत्रातील नामवंत विधीज्ञ कै.ॲड.प्रल्हाद दगडू काळे यांचे ते सुपुत्र आहेत त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
त्यांची भारत सरकार नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सोलापूर वकील संघटना, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.