भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे कोल्हापूर येथील पोलिस टाईम चे पत्रकार निवृत्ती धांडोरे यांनी तेज न्यूज चॅनल च्या परिवारास सदिच्छा भेट दिली.
यावेळी बोलताना धांडोरे म्हणाले की ग्रामीण भागात आपले चॅनल असून ही राज्यातील इतर जिल्यातील बातम्या आपल्या पोर्टल,चॅनल वर वाचण्यास मिळतात.आम्हाला तर आपल्या बातम्या मुळे गावातील, तालुक्यात,जिल्यातील बातम्या समजतात.
आपल्या चॅनल ची प्रगती होत राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.असे ही धांडोरे म्हणाले.
यावेळी पत्रकार निवृत्ती धांडोरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संपादक प्रशांत माळवदे,प्राची माळवदे,ओंकार माळवदे उपस्थित होते.