शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते पं.सुहास व्यास यांना जितेंद्र अभिषेकी पुरस्कार प्रदान
पं.राजा काळे ,पं.रघुनंदन पणशीकर आणि पं.आनंद भाटे यांच्या गायनाने रसिक तृप्त
पं.जितेंद्र अभिषेकी यांचे सांगितिक कार्य कलाकारांना प्रेरणादायी:-डॉ रघुनाथ माशेलकर
पुणे प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे पद्मश्री जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
सुरुवातीला जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,मा.महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ,आपला परिसरचे आणि पुणे महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते मा.उज्वल केसकर,पं.शौनक अभिषेकी,पं.सुहास व्यास,सानिया पाटणकर, गोविंद बेडेकर, रामदास पळसुले, अध्यक्ष महेश पानसे, रामदासी काका,बडेकर समूहाचे प्रवीण बडेकर यांच्या शुभहस्ते अभिषेकी बुवांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.आणि पं सुहास व्यास यांना पद्मश्री जितेंद्र अभिषेकी पुरस्कार,प्रथीतयश गायिका पुरस्कार सानिया पाटणकर , यशस्वी आयोजक पुरस्कार गोविंद बेडेकर आणि पष्ट्यब्दीपूर्ती निमित्त रामदास पळसुले यांचा सत्कार संपन्न झाला.त्यानंतर रघुनाथ माशेलकर , चंद्रकांत दादा पाटील,मुरलीधर मोहोळ,यांनी आणि पुरस्कार मूर्ती सुहास व्यास यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पं.अभिषेकी बुवांचे अभिजात शास्त्रीय संगीतातील योगदान खुप मोठं असून त्यांच्या नावाने सुरू असलेला हा संगीत महोत्सव सर्व कलाकारांना प्रेरणादायी असून पुणे नगरीचे सौभाग्य आहे की याद्वारे ही परंपरा पुण्यनगरीत जपली जाते आहे.अभिषेकी बुवांच्या सांगीतिक आठवणींना उजाळा दिला.प्रास्ताविक महेश पानसे यांनी केले.
यानंतर ख्यातनाम गायक पं.रघुनंदन पणशीकर, यांच्या स्वराभिषेक या सुश्राव्य गायनाला सुरुवात झाली.यामध्ये पं.जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या बंदिशी,रचना, तराणा नाट्यगीत, अभंग,त्यामध्ये राग यमन मध्ये तराणा गाऊन राग रागेश्री गायला,त्यानंतर गुंतता हृदय हे,अवघे गर्जे पंढरपूर,गायले,त्यानंतर पं.आनंद भाटे यांनी सुरुवात राग मारुबिहाग रागा मधील गुरु पं.भिमसेन जोशी आणि अभिषेकी बुवांच्या दमदार बंदिशी गाऊन स्वरानंद दिला.देवा घरचे ज्ञात कुणाला, अबीर गुलाल उधळीत रंग गाऊन रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.शेवटी पं.राजा काळे सुरुवातीला राग स्वानंदी अतिशय सुंदर गायला.त्यानंतर रागमाला सादर करत बुवांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण बंदिशी गात गुरुंना स्वरवंदना वाहिली .चोखंदळ पुणेकर कलारसिकांना मंत्रमुग्ध करत रसिक श्रोत्यांनीही तितकीच टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली.त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला निखिल फाटक पखवाजसाथ ज्ञानेश्वर दुधाणे टाळ साथ माऊली टाकळकर स्वरसाथ शाम जोशी, सत्यजित बेडेकर,सौरभ काडगांवकर, कौस्तुभ खंडाळकर,अभेद अभिषेकी यांनी केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रृती निगुडकर आणि रविंद्र खरे यांनी केले तर आभार दीपक पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला परिसर चे सर्वं कार्यकर्ते, तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अभिषेकी शिष्य परिवार अधिक परिश्रम घेत आहेत तीन दिवसात पाच सत्रात चालणाऱ्या या महोत्सवास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उज्वल केसकर आणि पं.शौनक अभिषेकी यांनी केले आहे.