केळशी प्रतिनिधी
दिनांक 21/3/2024 रोजी जि.प.प्राथ.केंद्रशाळा केळशी नं 1 शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.दिप्ती दत्तात्रय माळवदे यांची रत्नागिरी तालुक्यात बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ शाळेने आयोजित केला होता.
त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य, उपाध्यक्ष तसेच पालक वर्ग व सहकारी सर्व शिक्षक हजर होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पालकांनीही मनोगत व्यक्त केले. प्रामुख्याने सर्वांच्या आवडत्या, लाडक्या शिक्षिका, स्कॉलरशिप साठी जीव तोडून काम करणाऱ्या शिक्षिका, असा उल्लेख सर्वांनी आपल्या भाषणात केला.
याप्रसंगी सर्व पालक व विद्यार्थी तसेच स्वतः माळवदे यांनी आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिका भाऊक झाल्या. सर्वांचे डोळे पाणावले. माळवदे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये या गावाने मला खूप प्रेम दिले माझी केळशी, माझा गाव, माझी शाळा, माझे विद्यार्थी यांना सोडून जाताना खूप त्रास होत आहे. परंतु परतीचे पंख छाटलेले आहेत, त्यामुळे जावेच लागत आहे या गावाशी माझे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत जर परमेश्वराने पुन्हा एकदा जन्म दिला आणि शिक्षिका केले तर या विद्यार्थ्यांचा, गावाचा सहवास मला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना असे म्हणत अश्रूंना वाट करून दिली.
माळवदे यांना निरोप देताना सर्वजण रडू लागले पालकांनी माळवदे यांचे भरभरून कौतुक केले. माळवदे यांना मुलांनी ग्रीटिंग, तसेच पालकांनी आणि प्रत्येक वर्गाकडून, शाळेकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
माळवदे यांनी शाळेला स्मार्ट टीव्ही घेण्यासाठी 10 हजार रुपये देणगी दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पालशेतकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन विनोद जाधव यांनी केले.