महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा मिळतील
वरळी प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी येथील एनएससीआय डोम येथे शिवसेनेच्या पक्ष कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. शिवसेनेचे राज्यभरातील सर्व नेते, प्रवक्ते, खासदार, आमदार, सचिव, प्रचारक, पदाधिकारी,मतदारसंघातील निरीक्षक यांना मुख्यमंत्री महोदयांनी लोकसभा निवडणुकीच्या कामाबाबत मार्गदर्शन केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठीचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यासाठीच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्यासाठी या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या ४५ हून अधिक जागा जिंकण्याबाबतची रणनीती निश्चित करण्यात आली.