पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
धर्मादाय रुग्णालयामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व त्या वर नियंत्रण ठेवणे या समितीवर सदस्य म्हणून पंढरपूर मधील बाल रोग तज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ.प्रतापसिंह शिवाजीराव घाडगे यांची सोलापूर जिल्हा स्तरीय समिती सदस्य म्हणून निवड झाली.
बाल आरोग्य सेवेत गेली दहा वर्षे कार्य करणारे डॉ घाडगे अजनसोंड येथील असून पंढरपूर
शहर ग्रामीण भागा मधील बाल रुग्णांची सेवा करत आहेत.विविध सामाजिक उपक्रमात सहभागी राहून आरोग्य शिबिर आयोजित करून समाज सेवेचे व्रत घेवून कार्य करणारे डॉ घाडगे यांना या कर्यात शुभेच्छा देण्यासाठी मा.नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ सचिन चव्हाण,डॉ सौ.दीपश्री घाडगे,अजय कदम,कमलाकर गोटेकर,राहुल साबळे, सौ.अर्चना साबळे, डॉ श्रीकांत खटावकर हॉस्पिटल स्टाफ, व मित्रमंडळ उपस्थित होते.